
केज /प्रतिनिधी
दि.१६ केज तालुक्यातील मौजे राजेगाव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघ संचलीत अन्याय आत्याचार निवारण समितीच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी संस्थापक अध्यक्ष विजयजी सुर्यवंशी साहेब यांच्या आदेशानुसार निवड करण्यात आली. केज तालुक्यात गेली सात वर्षे पासुन छोटंसं रोपटं लावलं त्याचं आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संघात नियमीतता जपली जाते त्यामुळे संघाशी एकनिष्ठता बघायला मिळते. संघातील नियमितता एकवाक्यता सर्वांशी एकात्मता जुळवुन कामाचा लेखाजोखा यापासुन हि जबाबदारी आदरणीय साहेबांनी पत्रकार अमोल सावंत यांच्या वर सोपवली आहे हे पाहता सर्व मित्र कंपनी, पदाधिकारी यांनी शुभेच्छा चा वर्षाव केला पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
