केज /प्रतिनिधी
केज दि. 27 मौजे हनुमंत पिंपरी येथील शेतकरी अशोक नागोराव देशमुख यांच्या सर्वे नंबर 24 मधील शेतात सोलर पॅनल बसवलेले होते ते दिनांक 25 5 2026 रोजी अवकाळी पावसामुळे व जोरदार सुसट्याच्या वाऱ्यामुळे शेतात बसवलेले सोलार पॅनल साक्षात खाली मुंडकं वर पाय झाले आहे. अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसाने हाहाकार माजवला सोलर पॅनल नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पंचनामा महसुलाधिकारी यांच्या समक्ष करण्यात आला त्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे खालील प्रमाणे 1) देशमुख अशोकराव नागोराव 3) दातार महादेव शेषराव 3) घोरपडे नवनाथ हरिदास 4) चंदनशिव विश्वास विनायक 5) चंदनशिव जीवन विनायक अशाप्रकारे सोलर पॅनल नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत ग्राम महसूल अधिकारी यांच्या समवेत पंच यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामा केला. पंचनामावर स्वाक्षरी करणारे 1) चंदनशिव महेश लक्ष्मणराव 2) घोरपडे गणेश महादेव 3) चंदनशिव वासुदेव हनुमंत 4) चंदनशिव नवनाथ सुग्रीव 5) देशमुख राजकुमार अरुणराव या पंचांच्या प्रत्यक्ष पंचनामा करण्यात आला प्रत्यक्ष शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे सध्या पाण्याचे टंचाई लाईटचा कमीपणा यामुळे शेतकऱ्यांनी सोलार पॅनल बसवले अतिशय आनंदामध्ये दिवसा सोलर पॅनलने आपली शेती भिजवण्याचे काम करत आपला उदरनिर्वाह भागवत आहेत .अशातच अवकाळी वादळ झाल्यामुळे सोलार पॅनलचे नुकसान भरपाई शासन दरबारी मांडून मिळणे अशी शेतकऱ्यांच्या मनामध्ये खंत आहे .

