
केज/प्रतिनिधी
दि.14 जुन केज, सविस्तर वृत्त असे की मोजे राजेगांव ग्रामपंचायत कार्यालयामार्फत सन 2025/2026 मध्ये इयत्ता दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम दिनांक 13 ६ २०२६ रोजी वार शनिवार ठेवण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ अशा प्रकारे ट्रॉफी शाल श्रीफळ देऊन सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित मान्यवर शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर ज्योतीताई विनायकराव मेटे, उत्तरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ हनुमान पिंपरी चे सचिव आशुतोष भैया मेटे, शिवसंग्रामच्या महिला आघाडी बीड जिल्हाध्यक्ष अडवोकेट मनीषाताई कुपकर, केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री विठ्ठल नागरगोजे सर, प्राध्यापक योगीराज बापू मेटे, जय शिवसंग्राम चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रामहरी भैया मेटे, सरपंच सौ सुशीलाबाई अविनाश मस्के, उपसरपंच एडवोकेट प्रवीण योगीराज मेटे , सर्व ग्रामपंचायत सदस्य ,सेवक आणि पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक गावकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहशिक्षक श्री वरवडे सर यांनी केले प्रथमतः कैलासवासी विनायक रावजी मेटे व नारायण हरिभाऊ मेटे, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये प्रथम आलेल्या चिरंजीव आरशाण शकील शेख, द्वितीय कुमारी श्रुती शिवाजी मेटे, तृतीय मेटे तेजस्विनी संतोष यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर इयत्ता बारावी वर्गामध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रथम चिरंजीव वेदांत बापूराव जाधव, द्वितीय श्याम सुंदर मेटे, तृतीय बालिका बाळासाहेब मेटे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर नोकरी व सामाजिक क्षेत्र यामधील नावलौकिक झालेल्या सर्व उमेदवारांचे सत्कार करण्यात आले त्यातच राजेगाव नगरीचे नाव उज्वल करणाऱ्या दोन सुनांचा भव्य नागरिक सत्कार समस्त गावकरी मंडळ उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते डॉक्टर ज्योतीताई विनायकराव मेटे व प्राध्यापिका शांताताई बालासाहेब गीते या दोन सणांचा सर्व गावकऱ्यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले कुठलीही गोष्ट करायची म्हटलं कष्ट करण्याचे हिम्मत अंगी असणं गरजेचं आहे सध्याचे युग मोबाईलचे युग म्हटलं जातं म्हणून विद्यार्थ्यांना वेळे पुरत मोबाईल कड लक्ष देणे गरजेचे आहे, हसा खेळा पण शिस्त पाळा आणि आपलं जीवन उज्वल करा असा मंत्र उपस्थित मान्यवरांच्या समवेत विद्यार्थ्यांना देण्यात आला. तसेच वेळोवेळी सूत्रसंचालन करत वरवडे सरांनी सर्व मान्यवरांचे लक्ष वेधलं यावर्षी ज्याप्रमाणे हनुमान विद्यालय राजेगाव व श्री ज्ञानेश्वर माऊली विद्यालय उत्तरेश्वर पिंपरी या ठिकाणातील विद्यार्थी दहावी बारावी मध्ये यश उज्वल करून आज सत्कारआर्थ झाले त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी देखील पुढच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये स्कॉलरशिप परीक्षा देऊन सत्कारासाठी हजर असतील असा शब्द सर्व गावकऱ्यांना दिला आहे. स्वर्गीय करीम उस्मान शेख यांच्या स्मरणार्थ इयत्ता दहावी व बारावी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना 2501 रुपये देऊन आपले नाव न सांगता कार्यक्रमाकडे लक्ष वेधले ,तसेच कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती दर्शविली शोभा वाढवली याबद्दल पत्रकार रवींद्र मेटे यांनी आभार व्यक्त केले आणि कार्यक्रम संपला असे जाहीर केले.
