केज/प्रतिनिधी
दि.06 डिसेंबर श्री दत्त मंदीर देवस्थान ,दळवेवस्ती केज येथे हिंन्दु शालीवाहन शके 1946 मार्गशीष पौर्णिमा शनिवार दि.14 डिसेंबर 2024 रोजी श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आसुन दोन दिवसीय धार्मीक कार्यक्रम आयोजन दत्त मंदीर देवस्थान ट्रस्ट समिती व सर्व भाविक भक्तामार्फत करण्यात आले आहेत .ह.भ.प.श्री दिपक महाराज मेटे लहुरीकर यांचे सुश्राव्य किर्तन दि.14 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10:00 ते 12:00 या वेळेत व नंतर महाप्रसाद श्री .दत्त मंदीर देवस्थान ,दळवेवस्ती केज या ठिकाणी होणार आहे तरी पंचकृषीतील सर्व लहान थोर भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आसे आव्हाहन करण्यात आले आहे .दत्त माझा |मी दत्ताचा || दत्त दत्त म्हणता वाचे | तेणे सार्थक जन्माचे ||मणे चिंतावा श्री दत्त ||आंतर्बाह्य पुर्ण भरीत || दत्त रुप पाहे डोळा || तेणे भय कळिकाळा || एका जनार्दनी जपा || मंत्र द्वाक्षरी हा सोपा || दिंगबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा या जयघोषात कार्यक्रमाची शोभा वाढणार.