केज/प्रतिनिधी
दि.17 नोव्हेंबर केज विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या प्रचारार्थ राष्ट्रीय सचिव भाजपा, लोकनेत्या आमदार मा.पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जाहीर सभा आंबाळा चा बरड फाटा केज येथे सायंकाळी 06:30 वाजता संपन्न झाली.
या सभेत मा.ताईसाहेबांनी केज विधानसभा मतदारसंघात मागील ५ वर्षांत झालेल्या विकासकामांची दखल घेत नागरिकांनी भाजपा-महायुतीची उमेदवार म्हणून मला पुन्हा एकदा मतरुपी आशीर्वाद द्यावे असे आवाहन केले.
या जाहीर सभेप्रसंगी मा.खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्यासह केज विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि केज विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते.