लोकनेता न्युज नेटवर्क
दि.18 जिल्ह्यातील घाटनांदूर रेल्वे स्थानक, सामान्य प्रवाशी आणि मालवाहतूक करण्यासाठी महत्वाचे स्थानक आहे. परंतू या रेल्वे स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून रेल्वे गाड्या थांबविणे बंद झाले आहे.परिणामी घाटनांदूर भागातील नागरिकांना रेल्वे स्थानक असताना देखील फायदा होत नाही.त्यामुळे घाटनांदूर मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वे थांबविण्यात याव्यात, आशा मागणीचे निवेदन खा.बजरंग सोनवणे यांनी रेल्वे बोर्डाचे केंद्रीय अध्यक्ष सतीश कुमार, रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्ली येथे भेट घेवून सोमवार (ता.16) रोजी दिले आहे. त्यामुळे घाटनांदूर परिसरातील जनतेची अडचण दूर होणार आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील रेल्वे स्थानक सार्वजनिक वाहतूकीसाठी परळी ते लातूर दरम्यान महत्वाचे स्थानक आहे. कोविड-१९ महामारीपूर्वी औरंगाबाद-गुंटूर आणि नांदेड-बंगलोर गाड्या नियमितपणे घाटनंदूर येथे थांबत होत्या. परंतु नंतर थांबणे थांबवले गेले. घाटनंदूर आणि त्या परिसरातील नागरिकांसाठी असुविधाजनक आहे.त्यामुळे या ठिकाणी रेल्वे गाड्या थांबविण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे केले.
घाटनांदूर रेल्वे स्थानक येथे औरंगाबाद-गुंटूर: ट्रेन क्र. १७२५४, गुंटूर – औरंगाबाद: ट्रेन क्र. १७२५३,बंगलोर – नांदेड: ट्रेन क्र. १६५९३, नांदेड – बंगलोर: ट्रेन क्र. १६५९४, नांदेड – पनवेल: ट्रेन क्र. १७६१४, पनवेल – नांदेड: ट्रेन क्र. १७६१३ या रेल्वे थांबविण्यात याव्यात अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी केली.