केज /प्रतिनिधी
केज दि. 02 राष्ट्रीय पातळीवर पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी लढत असलेल्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची नवीन वर्ष 2025 ची राज्य कार्यकारणी संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांनी जाहीर केली.त्यात केज तालुक्याचे भूमिपुत्र पत्रकार दत्तात्रय मुजमुले यांची राज्य सचिव पदी निवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी,राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अढांगळे, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार यांच्या आदेशानुसार दैनिक प्रभास केसरीचे कार्यकारी संपादक तथा स्टार 24 न्यूज चॅनेलचे संपादक दत्तात्रय मुजमुले यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या राज्य सचिव पदी पदी निवड करण्यात आली आहे.पुरोगामी पत्रकार संघात मुजमुले यांनी सन 2018 पासून संघात तालुका उपाध्यक्ष पदापासून काम सुरू केले होते.सन 2019- 2020 साली तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.त्यानंतर त्यांनी बीड जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जबाबदारी पार पाडली होती.तर मागील वर्षी 2024 साली बीड जिल्हाध्यक्ष म्हणून आणि प्रभारी राज्य प्रसिध्दी प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. पुरोगामी पत्रकार संघात काम करत असताना दिव्यांग सेवा समिती,कला क्रीडा विश्व समितीचीही शाखा तयार केल्या आहेत.तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघाची शाखा त्यांनी तयार केलेल्या आहेत.
पुरोगामी पत्रकार संघात आजवर विविध पदावर केलेल्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीबद्दल मित्रपरिवार, पत्रकार बांधव यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येते आहे.