केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी ते हादगांव रोड मंजूर मागील काही महिन्यांपासून करण्यात आला आहे परंतु विधानसभा इलेक्शनच्या आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे चिंचोली माळी ते हादगांव रोड चे काम केले नाही परंतु आचारसंहिता झाली इलेक्शन झाले अनेक महीने झाले परंतु चिंचोली माळी ते हादगांव रोडचे काम सुरू करण्यासाठी विलंब केला जात आहे कशामुळे विलंब केला जात आहे यांचे उत्तर सार्वजनिक बांधकाम विभाग केज यांनी द्यावे अन्यथा तात्काळ चिंचोली माळी ते हादगांव मंजूर रोडचे काम सुरू करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ केज तालुकाध्यक्ष रोहन गलांडे पाटील निवेदनाद्वारे करत आहेत तरी सार्वजनिक बांधकाम विभाग केज यांनी निवेदनाची दखल तात्काळ घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.