केज/प्रतिनिधी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
दि.09 “दैनिक भारत संग्राम “आयोजित स्वर्गीय मधुकर खंडारे यांच्या “स्मृतिप्रित्यर्थ” व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच समाज भूषण अर्जुन गवई यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ” राज्यस्तरीय पुरस्कार “सोहळा 2024 -25 आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी त्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते .यामध्ये नुकतेच पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे तसेच सामाजिक कार्यकर्ते
संपादक ज्ञानेश्वर बुधवत यांची डॉक्टर “बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. असे पत्र या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सचिन खंडारे यांनी दिले आहे. पत्रकारिता क्षेत्रामध्ये पत्रकार/संपादक ज्ञानेश्वर बुधवत हे लोकनेता या वृत्तपत्रांमध्ये आपल्या उत्कृष्ट लेखणीतून लिखाण करीत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची निवड राज्यस्तरीय “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कारसाठी करण्यात आली आहे. साखरखेर्डा येथे होणाऱ्या या भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडून मुळे विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.