दि.05 फेबु्वारी सविस्तर वृत्त असे की केज शहरातील रहिवासी श्रीराम विठ्ठल नेहरकर यांनी 5 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण केज तहसील समोर करण्याचा निर्णय घेतला आहे. उपजिल्हा रुग्णालयासमोर 18 बाय 66/ 11बाय 33 जागा खरेदी केलेली आहे .मला माझ्या पी टी आर वर जेवढी आहे ती जागा खुली करून देण्यात यावी. माझ्या शेजारी असणाऱ्या लोकांनी त्यावर अतिक्रमण केलेलं आहे हे अतिक्रमण प्रशासनाने हटवून मला माझ्या जागेवर हक्क मिळवून द्यावा. माझ्या कुटुंबातील व्यक्तीवर शेजाऱ्यांनी दबाव आणून शिवीगाळ केली. जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या तरी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद आहे. वरील प्रकरण मिटवून घेण्यासाठी पोलीस वाघमारे साहेब यांनी दबाव आणून सही घेण्याचा प्रयत्न केला. सर्व प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद असून आरोपी अटक होत नाही तरी तात्काळ आरोपीला अटक करून योग्य तो न्याय द्यावा. माझ्या कुटुंबातील व्यक्तीला कसल्याही प्रकारची इजा पोहोचली नाही पाहिजे व मला आणि कुटुंबाला संरक्षणाची गरज आहे ती प्रशासनाने द्यावी, यासाठी मी 5 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करत आहे .जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी उपोषण करणार आहे. मूळ मालक फ्लाॅट विक्री करणारे व रजिस्ट्री वरील साक्षीदार यांची चौकशी करावी व मला रीतसर न्याय द्यावा हि विनंती.